Wednesday 28 May 2014

श्री अष्टविनायक दर्शन आता वेबसाईटच्या माध्यमातून


श्री अष्टविनायक दर्शन
स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मोरेश्वर: सिद्धिद: |
बल्लाळस्तु विनायकस्तथ मढे चिंतामणीस्थेवरे ||
लेण्याद्रौ गिरीजात्माका सुवरदो विघ्नेश्वरश्चोझरे |
ग्रामे रंजनसंस्थितो गणपति: कुर्यात् सदा मंगलम् ||
          बारा ज्योतिर्लिंगे (महादेवाची बारा प्रसिद्धे ठिकाणे), देवीची साडे तीन पीठे (देवीचे चार प्रसिद्ध ठिकाणे ), त्याचप्रमाणे गणपतीची ‘अष्टविनायक’ म्हणजे आठ प्रसिद्ध ठिकाणे आहेत ती अशी-
१)
मोरेश्वर
-
पुणे जिल्ह्यात कऱ्हा नदीच्या काठी,
मोरगाव
२)
चिंतामणी
-
मुळा-मुठेच्या काठी
थेऊर
३)
सिद्धिविनायक
-
पुणे नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर भीमा काठी
सिद्धटेक
४)
महागणपती
-
शिरूर तालुक्यातील पुणे-नगर महामार्गावर
रांजणगाव
५)
विघ्नेश्वर
-
जुन्नर मधील कुकडी नदीच्या तीरावर
ओझर
६)
गिरिजात्मक
-
जुन्नर जवळील
लेण्याद्री
७)
विनायक
-
रायगड जिल्ह्यात खोपोली जवळ
महड
८)
बल्लाळेश्वर
-
रायगड जिल्ह्यात
पाली
या आठ ठिकाणांपैकी ,  
पाली, महड : रायगड जिल्ह्यात आहेत.
ओझर, लेण्याद्री, थेऊर, रांजणगाव आणि मोरगाव : पुणे जिल्ह्यात आहेत.
तर
सिद्धटेक : नगर जिल्ह्यात आहे.

अष्टविनायका डॉट नेट या वेबसाईटच्या  माध्यमातून आपण या आठ ठिकाणच्या स्वतंत्र वेबसाईटस् ला भेट देणार आहोत. शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने सादर केलेला हा धार्मिक उपक्रम आपणाला जरूर आवडेल अशी अशा व्यक्त करतो.

No comments:

Post a Comment